Sunday, May 10, 2020

मुंबई मेरी जान

आज मातृ दिन सर्व मातृतुल्य असणाऱ्यांना शुभेच्छापण आज विषय थोडा वेगळा सुचला थोडं वेगळं लिहिण्याची इच्छा झाली.

जवळजवळ दोन महिने होत आले कोरोना मुळे मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे, नव्हे नव्हे तर संपूर्ण जग भरात कोरोना च्या महामारीने हाहाकार माजवला आहे. लोक घरी बसून आहेत प्रशासन सगळ्यांना सहकार्य करत आहे, पोलीस, डॉक्टर, सरकारी कर्मचारी, प्राणी मित्र व इतर सर्वच जे समाजकार्य करीत आहेत अशांना खरच सलाम आहे. पण खरंच आज प्रत्येक जण आपल्या जीवाला भिऊन आपल्या गावी, राज्यात परतत आहेत आज ह्या मुंबईतून सर्वच जण आपल्या गृही परतत आहेत. पण खरंच आज ही मुंबई ह्या मुंबईने आज जगातून आलेल्या सर्वानाच आपल्या जवळ घेतलय कुशीत घेतलं ही मुंबई कधी कोणाला उपाशी नाही झोपू देत. प्रत्येकाची आपल्या लेकरा प्रमाणे काळजी घेते आज त्या मुंबईत संकट आलेल आहे आज आपण ह्याच आपल्या मुंबईची आपल्या आईची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण जो कष्ट करतो त्याचा साठी दोन वेळेचे घास ही मुंबई घेऊन नेहमीच तत्पर असते. दररोज लोकल मधला प्रवास रोज मुंबईतील आपल्या कामानिमित्त फिरणं ह्या सगळ्या गोष्टीची खूप आठवण येत आहे अगदी हे सगळेच जण नक्कीच करत असतील. रात्री, दिवसा, मध्यरात्री नेहमीच चालू असणारी लोकल किंवा बस सेवा या सगळ्यांचीच आठवण वारंवार होत आहे. या आपल्या मुंबई विषयी लिहावं तितकं कमी आहे आठवणी इतक्या आहेत की त्या जर लिहायला सांगायला बसलो तर शब्द अपूरे पडतील. रोज पाहणारे पर्यटक, अभ्यासक असे रोज नवनवीन चेहरे आम्ही यात पाहतच असतो. पदो पदी ही मुंबई आम्हांला शिकवते अशी ही मुंबई आमची आईच आहे. पुन्हा लवकर मुंबईत जायची इच्छा आहे लवकर भेट होउदे बस हीच प्रार्थना त्या परमेश्वराकडे आहे. झटणाऱ्या सर्वच हातांना यश दे आमची मुंबई लवकरच पुन्हा निरोगी होउदे आणि आमच्या सर्वच जणांची रोजी रोटी तयार करणारी मुंबई लवकरच तत्पर होउदे...

Sunday, August 19, 2018

जान से प्यारा...

नेहमी प्रमाणे काम उरकून घरी जायचे वेध लागले असता सांताक्रूझ प. येथुन सांताक्रूझ पू. येथे घरी जाण्यास निघालो. रोजच्या प्रमाणे कानात कॉड व गाणी ऐकत चालत होतो. थोडा पुढे आलो आणि माझा राष्ट्रध्वज एका दुकानाच्या बाहेर कच-यात पडला होता.
पाहून डोळ्यात पाणी आलं, दोनच तर दिवस झाले होते स्वातंत्र्य दिन साजरा करुन आणि लगेचच ध्वजाचा हा अपमान म्हणजे त्या दिवशी म्हटलेल राष्ट्रगान, केलेली प्रतिज्ञा सगळं सगळं व्यर्थ?
मी प्रथम त्या ध्वजाला उचलून साफ केल. परंतु बाजूलाच चहा पीत व आपल दुकान उरकत उभे असलेले अज्ञात इसम काही न झाल्या सारखे आपल्याच धुंदीत मग्न होते.
समोरून येणारी एक व्यक्ती मला म्हणाली बाळ बर झाल उचललस. त्यावेळेस खुप राग आला जे त्या तिरंग्याचा जवळ उभे होते पण पाहुनही न पाहिलेल्या सारख केल त्यांचा शेवटी निघताना शब्दाने वार करत इतकच बोललो "आपल्याला तर १५आॅगस्ट आणि २६जानेवारीलाच जाग येणार" त्यावर सगळे हो हो करु लागले. त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हतं. मी हातातील तिरंगा बॅगेतील लांबड्या वहित ठेवला व घरचा रस्ता गाठला.
परंतु डोक्यात विचारांचे कल्लोळ उठले होते एक एक नाव डोळ्यासमोर येत होती "भगतसिंग", "राजगुरू", "चंद्रशेखर आझाद", "सुभाष चंद्र बोस", "लो.टिळक", "सावरकर", "गांधी" "बाबु गेनू जे २०-२२ च्या वयात ज्यांनी आपल बलिदान दिले", एवढेच काय तर आता काल परवा शहीद झालेले "मे. राणे", २६/११ मधील "करकरे", "साळसकर", "मे. संदीप उन्नीकृष्णन", "तुकाराम" यांनी आणि यांसारखे अनेक जण ज्यांनी आपल्या प्राणांची देखील पर्वा नाही केली का तर माझा तिरंग्यावर दाग लागता कामा नये आणि दुसरीकडे मात्र आपण इतके व्यस्थ की त्याच तिरंग्याला पायदळी तुडवतोय.

                                                                  #खंत

सुरज स म्हशेळकर